निबंध : खेळाचे महत्त्व

sports equipment
Last Updated: गुरूवार, 11 मार्च 2021 (16:25 IST)
खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंतामुक्त करते.खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते. खेळ खेळाडूंना नाव, प्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो. म्हणून असे म्हणता येते की वैयक्तिक फायद्यासह व्यावसायिक फायद्यासाठी खेळ खेळले जातात.या दोन्ही मार्गांनी आपल्या मेंदूला शरीराला आणि आत्म्याला फायदा होतो.

खेळ आणि खेळाचे महत्त्व -
काही लोक आपल्या शरीराला आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी खेळतात. काहीजण आयुष्यात मौल्यवान दर्जा मिळविण्यासाठी खेळतात. कोणीही आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ह्याच्या महत्त्वाला नाकारू शकत नाही.
पहिले ऑलम्पिक खेळ 1896 मध्ये एथेन्स मध्ये आयोजित केले गेले. आता दर चार वर्षांनी विविध देशांमध्ये आयोजित केले जातात. या मध्ये मैदानी आणि अंतर्गत म्हणजे इनडोअर आणि आउटडोर दोन्ही प्रकारचे खेळ समाविष्ट आहे. या मध्ये विविध देशांचे खेळाडू भाग घेतात.

काही मैदानी खेळ म्हणजे फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेट, टेनिस, खोखो, कब्बडी आहे. हे खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता आहे. इनडोअर खेळ म्हणजे कैरम, पत्ते, बुद्धिबळ,टेबल टेनिस,कोडे सोडवणे इत्यादी आहे. जे घरात बसून देखील खेळले जाऊ शकतात. काही खेळ असतात जे इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही असतात. जसे की बॅडमिंटन आणि टेबलं टेनिस.

खेळ आणि त्याचे फायदे-

खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण हे वेळेचे बंधन, धैर्य,शिस्त,गटामध्ये काम करणे हे शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो.

खेळ खेळल्यामुळे अनेक आजारांपासून सुरक्षित राहण्यात मदत मिळते. जसे की संधिवात, लठ्ठपणा, हृदयविकार,मधुमेह इत्यादी. हे जीवनात धैर्य शिस्तबद्धता, वेळेचे पालन करणे आणि सभ्य बनवते.
आपल्यातील कमकुवत पणा कमी करून पुढे वाढणे शिकवते. हे शारीरिक आणि मानसिक दृष्टया आराम देतो . शूर बनवतो. राग आणि चिडचिड दूर करून सर्व समस्यांशी लढण्यासाठी सज्ज करतो.

खेळ खेळणे एका व्यक्तीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे शारीरिक बळ देण्यासह मानसिक सामर्थ्य देते. मैदानी खेळ जसे की फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेट, टेनिस, खोखो, कब्बडी हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे काम करतात. तसेच घराच्या आत खेळले जाणारे खेळ जसे की
बुद्धिबळ, सुडोकू हे मानसिक दृष्टया प्रबळ करतात आणि एकाग्रता वाढवतात. म्हणून खेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

संत्रीच्या अति सेवनाने आरोग्यास हानी होऊ शकते

संत्रीच्या अति सेवनाने आरोग्यास हानी होऊ शकते
उन्हाळा येतातच संत्रीचा हंगाम येतो.संत्री आणि त्याचे रस हे रणरणत्या उन्हात सेवन केल्याने ...

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

झिंक आणि व्हिटॅमिन सी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
कोरोनाच्या काळात या साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी सर्व प्रकारचे औषधे अवलंब केले जात ...

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे

कोरोना काळात कपालभाती योग कसे करावे
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात प्राणायामाचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः अनुलोम विलोम, ...

मास्क वापरताना या 10चुका करू नका

मास्क वापरताना या 10चुका करू नका
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. या विषाणूला टाळण्यासाठी सध्याच्या काळात मास्कचा ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक ...

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ
‘वेबदुनिया’ शी बोलताना डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की सध्या कोरोनाच्या उपचारात ...