रुक्ष कोरडया केसांमुळे चिंतित आहात? हे उपाय अवलंबवा
केसांचे गळणे सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा केसांची वाढ थांबते तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. चुकीची जीवनशैली, चुकीचे डाइट, तणाव, हार्मोनचे असंतुलन आणि अनियमित झोप यांचा परिणाम केसांवर देखील होतो. यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात. ज्यामुळे ते गळायला लागतात. तुम्ही काही उपायांना अवलंबवून केसांची गळणे कमी करू शकतात. महाग आणि नुकसानदायक प्रॉडक्टचा उपयोग न करता तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या केसांना वाढवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अश्या टिप्स बद्द्ल सांगणार आहोत ज्यांचे तुम्ही नियमित रुपाने उपयोग केला तर काही दिवसातच तुमच्या केसांची समस्या दूर होईल.
केस धुतांना कोणते पाणी वापरावे?
केसांना कधीही जास्त गरम पाण्याने धुवू नये. यामुळे केसांना नुकसान होते व केस रुक्ष आणि कोरडे होतात. म्हणून केसांना नेहमी कोमट पाण्याने धुवावे. केसांना धुतल्यानंतर कंडीशनर लावा. यामुळे केसांना चमक येईल.
आठवड्यातून किती वेळेस धुवावे केस?
जर केसांना तुम्हाला आरोग्यायी ठेवायचे असेल तर आठवड्यातून कमीतकमी तीन वेळेस केस धुवावे. केसांना धुतल्यानंतर कंडीशनर लावा. जर तुमचे टाळू कोरडे असेल तर केसांना आठवड्यातून कमीतकमी दोन वेळेस धुवावे. ज्या लोकांच्या केसांमध्ये तेल आणि मॉइश्चराइजर राहते त्यानी आठवड्यातून तीन वेळेस केस धुवावे. यामुळे तुमचे केस स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतील.
केसांची ट्रिमिंग करणे गरजेचे का आहे?
नैसर्गिकरित्या केसांना वाढवण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कुरळ्या केसांना अधिक ओलाव्याची गरज असते. तर स्ट्रेट केसांना कंडिशनरची गरज असते. याकरिता वेळोवेळी आपल्या केसांचे ट्रिमिंग करावे. यामुळे रुक्ष आणि दोनतोंड आलेले केस निघून जातील व केसांची वाढ देखील होईल. याशिवाय कर्लिंग आयरन, ब्लो ड्रायर आणि स्ट्रेटनर यांचा जास्त उपयोग करू नये. यामुळे केसांना नुकसान होते आणि त्यांची वाढ थांबते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik