रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जानेवारी 2024 (13:15 IST)

Hair Fall Remedies: टेंशनमुळे केस गळत आहे? हे तीन उपाय करून पहा

hair fall
Hair Fall Remedies आपण नेहमी नुकसान न करणारे केमिकल फ्री प्रोडक्ट शोधत असतो. जे आपल्या केसगळतीला थांबवू शकेल पण बाजारातून घेतलेल्या सर्व प्रॉडक्ट्समध्ये थोड्यातरी प्रमाणात केमिकल असते तुम्ही कुठल्यापण प्रोडक्टला केमिकल फ्री म्हणू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एक्सपर्टव्दारा सांगितलेले काही खास सीरम आणि पॅक सांगणार आहोत. ज्यात 1% पण केमिकल नाही आणि त्या हैक्सने तुमचे केस वाढतील आणि केस गळती पण बंद होईल. चला जाणून घेवू या घरच्या उपायांबद्द्ल ज्यांना वापरल्यावर केस गळती बंद होईल. 
 
मेथीदाने, तांदूळ, कढीपत्ता आणि कांद्याच्या सालीपासून बनवा सीरम 
हेल्थ एक्सपर्ट यांनी मेथीदाने, तांदूळ, कढीपत्ता आणि कांद्याची साल यापासून सीरम तयार केले आहे. तसेच हे पण सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या खाण्यापिण्यावर पण लक्ष दिले पाहिजे ज्याने केसगळती बंद होईल. 
साहित्य 
1 चमचा भिजवलेले मेथीदाने 
1 चमचा  बिजवलेले तांदूळ 
1 फांदी कढीपत्ता 
थोडेसे कांद्याची साल 
मेथीदाने आणि तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्यादिवशी सकाळी मेथीदाने आणि तांदूळ यांची पेस्ट बनवून घ्या. तसेच कांद्याची साल आणि कढीपत्ता सोबत उकळवून घ्या याला थंड करून गाळून घ्या. मग याला काचेच्या बाटलित भरा आणि आठवड्यातून दोन वेळेस लावा. 
 
मध आणि ओट्स  पॅक 
मध आणि ओट्स पासून बनवलेला पॅक  केसांची ग्रोथ करतो व केसगळती बंद होते. याला आठवड्यातून फक्त एकवेळेस लावल्यास चांगले परिणाम दिसतील. चला जाणून घेवू या पॅकला बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तूंची गरज आहे. 
साहित्य
2 मोठे चमचे ओट्स पावडर 
1 छोटा चमचा मध 
1 छोटा चमचा ग्लिसरीन 
थोडया प्रमाणात ओट्स घेवून ते बारीक करून त्याची पूड तयार करा. त्यानंतर यात ग्लिसरीन आणि मध मिक्स करा व हे चांगले मिक्स करा. हा एक छान असरदार होममेड हेयर पॅक तयार होईल. 
 
ग्रीन-टी पॅक 
ग्रीन-टीचा उपयोग लोक जास्तकरून वजन कमी करण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहित आहे का की ग्रीन-टीचा उपयोग केस गळती बंद करण्यासाठी पण होतो ग्रीन-टी मध्ये एंटीऑक्सीडेंट असते. जे आपल्या केसांना स्ट्रांग बनवायला मदत करतात. 
साहित्य
2 छोटे चमचे ग्रीन-टी 
यासाठी आपल्याला फक्त ग्रीन-टीची गरज असेल तुम्हाला बस टिवॉटरला आपल्या स्कैल्प वर लावायची आहे. याला एक तास लावून ठेवणे मग थंड पाण्याने धुवून टाकणे.