शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

जिथे मामा भाचे एकत्र जाऊच शकत नाहीत!

-शतायू जोशी

WD
सुट्टी लागली की, आपल्याला आठवते ते मामाचे गाव. लहानपणापासूनच आपल्याला मामाच्या गावाला जाण्याची एक वेगळीच ओढ असते. हे हे नाते आहे विश्वासाचे, प्रेमाचे. परंतु, मध्य प्रदेशात असे एक गाव आहे, जिथे मामा आणि भाचे एकत्र जाऊच शकत नाहीत.

नर्मदेच्या काठावर वसलेले नेमावर हे ते गाव. या गावातील नदीच्या अगदी मधोमध एक देवस्थान आहे. नाभी कुंड नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानात जायला नावेचाच आधार घेतला जातो.

WD
या देवस्थानाची खासीयत म्हणजे येथे जाताना मामा आणि भाचे एकत्र नावेतून जाऊच शकत नाहीत. असे करण्‍याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांच्याबाबतीत काही ना काही अपघात घडतो, अशी समजूत आहे.

मामा आणि भाच्याला या जागी एकत्र जायचेच असेल तर, त्यांनी ते ज्या नावेतून जाणार आहेत, तिची विधीवत पूजा करणे गरजेचे आहे. त्याचवेळी नर्मदा नदीची पूजाही त्या दोघांना करावी लागते.

WD
कन्नौद येथून आलेल्या धर्मेंद्र आणि आयुष अग्रवाल या मामा भाच्यांनी नावेत बसण्यापूर्वी नावेची आणि नदीची अशीच मनोभावे पूजा केली आणि आपल्याला सुरक्षित देवस्थानी पोहचवण्‍याची विनंती केली.

नावेची पूजा करणारे पुजारी पंडित अखिलेष यांच्याकडून आम्ही या विचित्र प्रथेसंदर्भात माहिती घेतली. ते म्हणाले, की पुरातन काळात एकदा भगवान कृष्णाला आणण्यासाठी कंस मामा याच मार्गे नावेने गेले होते. परतताना या नावेत भगवान कृष्णही होते. मामा आणि भाचे एकत्र येत असताना वाटेत शेषनागाने त्यांची नाव उलटवली. तेव्हापासून मामा आणि भाचे एकत्र कधीच या नदीतून प्रवास करत नाहीत.

आता या प्रथेला भीती म्हणायचे की अंधश्रद्धा तुम्हीच ठरवा.