स्नानाने (म्हणे) बरा होतो पक्षाघात

ShrutiWD
मध्य प्रदेशातील भादवा माता संस्थान म्हणजे रहस्याची अजब दुनिया आहे. येथील पाण्याने अंघोळ केल्यास म्हणे पक्षाघात बरा होतो. यामागे रहस्य तरी काय असा विचार करून मध्यप्रदेशातील नीमच शहरापासून पन्नास किलोमीटर असलेल्या भादवा माता मंदिरात जाऊन पोहचले. मंदिराच्या दोन्ही बाजूने पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. पुढे काही अंतरावरच मंदिर आहे. येथे आमचे स्वागत केले मंदिराचे व्यवस्थापक विश्वनाथ गेहलोत यांनी. त्यांच्याशी बोलत असतानाच मंदिराविषयी बरीच माहिती मिळाली.

फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भादवा माता ही भिल्लांची कुलदेवता आहे आणि याच जातीतील व्यक्ती येथील पुजारी असतो, गेहलोतांनी सांगितले. पक्षाघात बरा करण्याबाबत असलेल्या ख्यातीबाबत त्यांना विचारले, असता त्यांनी होकारार्थी मान हलवली. येथे चमत्कार होतात, असे त्यांनी सांगितले.

ShrutiWD
येथील मंदिर व पाण्याची विहीर खूप प्राचीन आहे. या विहिरीतील पाण्याने स्नान केल्यास पक्षाघाताच्या रूग्णांना फायदा होतो, असे सांगितले जाते. नवरात्रातील यात्रेदरम्यान येथे खूप गर्दी असते. गर्दी जास्त होत असल्याने प्रशासनाने टाकी बांधली आहे. गेल्या वीस वर्षांपासून विहिरीत स्नान करण्यास मनाई करण्यात आली आहे. विहिरीतील पाण्याने टाकी भरण्यात येते. हे पाणी स्नानासाठी वापरण्यात येते. महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्नानगृहही बांधण्यात आले आहे. रूग्ण व सामान्य भाविकही येथेच स्नान करतात.

श्रुति अग्रवाल|
आपल्याला काय वाटत भादवा मातेच्या आवारात असलेल्या पाण्यात आंघोळ करणे म्हणजे... यावर आपले मत नोंदवा


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या ...

श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने या प्रकारे त्याग केला आपल्या देहाचा
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्री रघुबीर भक्त हितकारी। नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई। सम भक्त और ...

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या
सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...