'पापमुक्ती' चे सर्टिफिकेट येथे मिळते

mandakini kund
जयपूर| वेबदुनिया|
WD
माणसाच्या हातून कळत-नकळत काही चुका घडत असतात. त्याबाबत प्रायश्चित घेण्याची किंवा तशी भावना असेल तर त्यासाठी क्षमा मिळवण्याची संधी प्रत्येक धर्माने त्यांना दिली आहे. अनेक धर्मांमध्ये पापक्षलानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. नद्या किंवा तीर्थांमध्ये स्नान केल्यानेही पापक्षालन होते, असे म्हटले जाते. मात्र तसे केल्याने तशी भावना जरी निर्माण होत असली तरी कुणी तसे लेखी लिहून देत नाही. दक्षिण राजस्थानमधील गौतमेश्वर या तीर्थावर मात्र 'पाप मुक्ती प्रमाणपत्र'ही दिले जाते.

या तीर्थावरील मं‍दाकिनी कुंडात स्नान केल्यावर तेथील पुजारी असे देतात. जयपूरपासून साडेचारशे किलोमीटरवरील आदिवासीबाहुल प्रतापगढ जिल्ह्यात हे स्थान आहे. अरावलीची पर्वतराजी आणि माळव्याच्या पठाराच्या संधीस्थळातील हे ठिकाण राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातच्या दरम्यान एक त्रिकोण तयार करते. येथील मं‍दाकिनी जलाला गंगेइतकेच पवित्र मानले जाते. महर्षी गौतमांना गोहत्येच्या पापापासून इथेच मुक्ती मिळाली होती, असे म्हटले जाते. या ठिकाणी अनेक आदिवासी, शेतकरी अशाचप्रकारे कळत-नकळत झालेल्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येत असतात. कुणाच्या हातून चुकून खार मारली गेलेली असते तर कुणाच्या हातून पक्ष्यांची अंडी फुटलेली असतात. कुणाच्या वाहनाच्या धडकेत कुठल्या तरी पशूचा जीव गेलेला असतो. अशी कोणतीही घटना घडलेली नसली तरीही शेती करताना अजाणतेपणे झालेल्या किडामुंगीच्या हत्येच्या पापापासून का होईना मुक्ती मिळवण्यासाठी लोक इथे येतात. त्यांना या ठिकाणी स्नान केल्यावर पंधरा रुपयांमध्ये हे पापमुक्तीचे प्रमाणपत्रही मिळते व ते समाधानाने परत जातात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्री रघुबीर भक्त हितकारी। नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई। सम भक्त और ...

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या
सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...

गुढी- नवीन नात्याची

गुढी- नवीन नात्याची
जोशी काकू फ्लेटच्या दाराजवळ येवून थबकल्याच. रात्रभराचा प्रवास झाला होता. थकवा तर होताच पण ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...