बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

मंगळ दोष असल्यास अमलात आणा हे 5 टोटके

ज्योतिषानुसार आपल्या कुंडलीत मंगळ असल्यामुळे आपला विवाहात अडचण येत असेल किंवा विवाह झाल्यावर संकटांना समोरा जावं लागत असेल तर आम्ही सांगत असलेले 5 उपाय अमलात आणा आणि निश्चिंत होऊन जा.
 
आपला मंगळ दोष शांत होईल.
पहिला उपाय
विवाह होत नसेल तर कुंभ विवाह करावे किंवा उज्जैन येथे मंगळनाथ मंदिरात जाऊन भात पूजन करवावे.
43 दिवस गायीला पोळीत गूळ घाळून खाऊ घालावे.

दुसरा उपाय
मंगळामुळे दांपत्य जीवनात संकट येत असल्यास सर्व व्यसन त्यागून हनुमानाची शरण घ्यावी. दररोज हनुमान चालीसाचा पाठ करावा.
मंगळवारचा उपास करून हनुमानाला शेंदुरी चोला चढवावा.
तिसरा उपाय
डोळ्यात पांढरे काजळ लावावे. पांढर्‍या काजळाचा खडा मिळाल्यास त्याला बारीक वाटून काजळ सारखं लावावे.

चौथा उपाय
वाहत्या पाण्यात रेवडी, बत्तासे आणि मध वाहू घालावे. पाणी स्वच्छ आणि वाहत असावं.
 
पाचवा उपाय
मसूर, मिठाई किंवा गोड भोजन दान करावे. लोकांना गूळ वाटावे किंवा मंदिरात गूळ दान करावे.