अडकित्तावाला बाबा
जबलपुरमधील भरो गावांतील घटना
|
आमच्या सूज्ञ वाचकांनी 'श्रद्धा आणि अंद्धश्रद्धा' यामधील भेद ओळखून योग्य निर्णय घ्यावा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी ओळखून तिच्यापासून इतरांना सावध करावे.आज आमच्या या विशेष लेखात आम्ही आपल्यासमोर एक अत्यंत ह्रदयदावक घटना मांडत आहोत.
त्या घटनेत अकरा लोकांचा मृत्यू झाला होता. याला
|
या बाबाचे खरे नाव ईश्वरसिंह राजपूत आहे. सुपारी कापण्याच्या अडकित्त्याने इलाज करत असल्यामुळे सामान्य लोक अडकित्तावाला बाबा या नावाने ओळखतात. याशिवाय सर्जन बाबा हेही त्याचे एक नाव आहे. डोळ्यांचा इलाज करणारा हा बाबा एड्स आणि कॅन्सरसारख्या रोगांचाही इलाज करत असल्याची अफवा पसरल्यामुळे इथे येणार्या लोकांच्या रांगच रांग लागलेली असायची.
बाबाची इलाज करण्याची पद्धत भयंकर म्हणावी अशीच होती. रूग्णाच्या तोंडावर घोंगडी टाकून त्याच्या डोळ्यात अडकित्त्याचा एक भाग घालून इलाज करत असे. ज्या व्यक्तीने अगोदर डॉक्टरकडून इलाज केला आहे किंवा त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली आहे, अशा व्यक्ती त्याच्याकडे इलाज करण्यासाठी येत असत.
|
|
|
|
बाबाने पसरविलेल्या या अफवेवर विश्वास ठेवून हजारो लोक गुरूवारच्या दिवशी पवित्र जल आणि अडकित्त्याने इलाज करण्यासाठी भर्रा गावी येत. हळूहळू बाबाची कीर्ती वाढत गेली आणि हजारोच्या संख्येने लोक बाबाकडे यायला लागले. वाढत्या लोकसंख्येमुळे गावकर्यांना त्रास व्हायला लागला म्हणून गावकर्यांनी बाबाला येथून निघून जाण्यासाठी सांगितले.
त्यावर बाबाने गाव सोडून जात असल्याचे सांगितले व या
|
एवढी मोठी गर्दी पाहून बाबा पण घाबरून गेला. कथित पाणी प्यायला देण्याऐवजी गर्दीवर पाणी फेकण्यास सुरवात केली. फेकलेले पाणी पिण्यासाठी गर्दीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोक मृत्यूमुखी आणि अनेकजण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बाबाला अटक केली.
|
|
|
या दुर्घटनेनंतर जेव्हा आम्ही गावकर्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की बाबा इलाज आपल्या शेतात असलेल्या आश्रमात करीत असे. इलाज करण्यासाठी पैसे घेत नसे. परंतु, त्याच्या सहकार्यांनी शेतात दुकाने मांडली होती. या दुकानातून पूजेसाठी लागणारे सामान दुप्पट किमतीने विकले जात असे.
जर कुणाची इच्छा असेल तर बाबाला आपल्या इच्छेप्रमाणे
|
आमचा वाचक 'श्रद्धा आणि अंधश्रद्धा' यामधील फरक जाणतो असा आम्हाला विश्वास आहे. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन फसविणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे आम्ही व्रत हाती घेतले आहे. म्हणूनच दर मंगळवारी आम्ही अशा कथा आपल्यासमोर मांडत आहोत.
