शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

मुलगा हवाय? भेटा या डॉक्टरला!

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपली गाठ घालून देतोय ती एका आयुर्वेदिक डॉक्टरशी. या डॉक्टरच्या ट्रिटमेंटमुळे हमखास मुलगा होतो, असा त्याचा लौकीक आहे. या डॉक्टरचे नाव आहे पवनकुमार अजमेरा. आईच्या पोटात असतानाच अर्भकाचे लिंगनिर्धारण आपण करतो, असा त्याचा दावा आहे.


मध्य प्रदेशातील इंदूरच्या गांधीनगर भागात या डॉक्टरचा दवाखाना आहे. मुलगा होण्याचा हमखास इलाज केला जातो, असे या दवाखान्यातील भिंतीवर लिहिले आहे. ज्या महिलांना मुलगी आहे, त्यांनाच आपण देत असलेले औषध लागू पडेल आणि मुलगा होईल, असे या डॉक्टरचे म्हणणे आहे. त्यासाठी दवाखान्यात येताना मुलगी असल्याचा पुरावा बरोबर आणावा लागतो.

या दवाखान्यात येणार्‍या अनेक महिलांच्या मते डॉक्टरांचा दावा योग्य आहे. पवनकुमारच्या औषधांमुळेच आपल्याला मुलगा झाल्याचा दावा त्यांनी केला.

पवनकुमारच्या या दाव्यांवर डॉक्टर मंडळींचा मात्र अजिबात विश्वास नाही.

WD
एकीकडे देशात मुलींचा जननदर खाली येतो आहे. जन्मापूर्वी लिंग परिक्षणाला सरकारने बंदी घातली आहे. त्याचवेळी दुसरीकडे हमखास मुलगा होण्यासाठी औषधे देणारे डॉक्टरही कार्यरत आहेत. प्रशासनही या सगळ्या प्रकरणाकडे डोळेझाक करते आहे. या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला जरूर कळवा.