बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2015 (09:56 IST)

आता तांदूळही महागणार?

rice rate
मुंबई- डाळीपाठोपाठ आता तुमच्या ताटातला भातही महाग होण्याची चिन्हे आहेत. वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राशी निगडित असलेल्या असोचेम या संस्थेने हे निरीक्षण नोंदवले आहे.

वाया गेलेला खरीप, घटलेले पाऊसमान आणि कमी होत चाललेला साठा या तीन घटकांमुळे तांदळाचे दर आकाशाला भिडणार असल्याचा दावा असोचेमच्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.