1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

19 रूपयात बदला मोबाइल ऑपरेटर!

मोबाइल ऑपरेटर
ND
ND
मोबाइल क्रमांक न बदलता मोबाइल कंपनी बदलने अर्थात मोबाइल नंबर पोर्टेबलिटी (एमएनपी) ग्राहकांचे हे स्वप्न आता अवघ्या 19 रूपयात पूर्ण होणार आहे. दूरसंचार निगम प्राधिकरणने (ट्राई) काल, शुक्रवारी एमएनपीचे दर नि‍श्चित केले आहेत.

एमएनपी सुविधा 31 डिसेंबरपासून महानगर व 'अ' श्रेणी सेवा क्षेत्रातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे तर देशातील इतर भागात ही सुविधा 20 मार्च 2010 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल.

ही सुविधा फारच महागडी असेल, अशी मोबाइल ग्राहकांमध्ये चर्चा होती. मात्र ही सुविधा घेण्‍यासाठी मोबाइल ग्राहकाला रू. 19 एवढा नाममात्र शुल्क लागणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा