1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

BASF पाच हजार जणांना भरती करणार

BASF पाच हजार जणांना भरती करणार
जर्मनीची रसायने तयार करणाऱ्या बीएएसएफने भारत आणि चीनमध्ये आगामी काळात पाच हजार जणांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनी आगामी काळात दोन अब्ज युरोची गुंतवणूक करणार असून 2020 पर्यंत प्रशांत महासागरातील विविध देशांत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 20 हजारांवर नेण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. सध्या कंपनीत 15 हजार कर्मचारी काम करतात.