PFC 30 कोटी डॉलर रोख जमवणार
पावर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अर्थात पीएफसीच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षात 91 टक्क्यांची तगडी वाढ झाली असून, आगामी दोन महिन्यांमध्ये बाजारातून कंपनी 30 कोटी डॉलर रोख जमवणार आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक सतनाम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, कर्ज स्वरूपात ही रोख जमवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील दोन वर्षांपासून कंपनीने विदेशी बँका आणि कंपन्यांकडून कर्ज घेतलेले नसून, आता व्याज दरात कपात करण्यात आल्याचा फायदा कंपनी घेणार असल्याचे ते म्हणाले.