शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (11:14 IST)

Lockdown दरम्यान LIC चे ग्राहक फेक कॉल्सपासून राहा सावध

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC सर्वात विश्वासार्ह्य आणि सुरक्षित मानले जाते. विमाच्या बाजारपेठेत ह्याचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. यामध्ये आपले पैसे सुरक्षित राहतातच याच बरोबर आपल्याला काही पॉलिसीवर चांगले रिटर्न सुद्धा मिळतात. 
 
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या लॉक डाऊनच्या काळात बनावटी कॉल करून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 
 
एलआयसीच्या ग्राहकांना अजून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांना अश्या बनावटी कॉल पासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ग्राहकांना सतर्क आणि जागरूक राहण्यास सांगितले आहे. एलआयसी ने आपल्या ग्राहकांसाठी या फसवणुकी पासून वाचण्यासाठी काही टिप्स दिल्या आहे. 
 
कंपनीने सल्ला दिला आहे : कंपनीने आपल्या ग्राहकांना पॉलिसी बद्दल चुकीची माहिती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या अश्या फसवी कॉल पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच एलआयसीचे अधिकारी बनून किंवा आयआरडीएय (IRDAI ) अधिकाऱ्यांच्या नावाने लोकांना आपल्या जाळत अडकवतात. अलीकडल्या काळात विमा रक्कम तातडीने मिळणाऱ्याच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकार दृष्टीस आले आहे. 
 
ही खबरदारी ठेवावी : 
कंपनीच्या म्हणण्यानुसार अश्या कोणत्याही कॉलवर जास्त बोलू नका जे आपल्याला पॉलिसी बद्दलची माहिती मागत असतील. फोन करणारा आपल्याला आपली पॉलिसी सरेंडर करण्याबाबत किंवा जास्त नफा मिळवून देण्याबाबत माहीती देत असल्यास त्वरित फोन बंद करावा. त्याचा बोलण्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या कोणत्याही पॉलिसी संदर्भात खासगी माहिती देऊ नये. 
 
त्वरित हे करावे : 
पॉलिसीच्या संदर्भात काहीही माहिती मिळवायची असल्यास LIC च्या संकेत स्थळावर www.licindia.in 
यावर भेट द्या. किंवा एलआयसीच्या अधिकृत शाखेशी संपर्क साधावा. आपल्या फोन कॉल सह पूर्ण तपशील नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद करता येईल. या शिवाय आपण आपली तक्रार [email protected] या संकेत स्थळावर सुद्धा करू शकता.