सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2017 (10:13 IST)

जीएसटीचे प्रमोशन करणार अमिताभ बच्चन

जीएसटी अर्थात  वस्तू सेवा कराच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.

केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करणार आहे. यासाठी तयार केलेला 40 सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्वीट केला आहे.

‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे. भारताच्या तिरंग्यातील तीन रंगांप्रमाणे जीएसटी ही एकत्रित शक्ती आहे. जीएसटी हा ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ’ निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे, असं अमिताभ बच्चन व्हिडिओमध्ये सांगत आहेत.