April New Rules : नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात अनेक महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून बँकिंग, आयकर, डिजिटल पेमेंट, क्रेडिट कार्ड इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. असे म्हटले जात आहे की या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो. तर या सर्व बदलांबद्दल जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही वेळेत त्यांच्यासाठी स्वतःला तयार करू शकाल.
UPI नियमात बदल
NPCI ने हे स्पष्ट केले आहे की 1 एप्रिल 2025 पासून ज्यांचे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत ते सर्व UPI व्यवहार बंद केले जातील. जर तुम्हाला हे सुरू ठेवायचे असेल तर त्यापूर्वी तुमच्या खात्याशी नवीन नंबर लिंक करा. एवढेच नाही तर, गेल्या १२ महिन्यांपासून वापरलेले नसलेले सर्व UPI आयडी देखील निष्क्रिय केले जातील.
आता FD वर अधिक फायदा
आतापासून FD, RD व इतर बचत योजनांवर बँकांनी १ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस न कापण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५० हजार रुपये होती. पण आता ते एक लाख करण्यात आले आहे. तर इतर गुंतवणूकदारांसाठी मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.
FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरांमध्ये बदल
SBI, HDFC, IDBI सह अनेक बँक १ एप्रिलपासून बचत खाते आणि FD वरील व्याज दरांमध्ये बदल करत आहे याची पूर्ण माहिती आपल्याला आपल्या बँकेची अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल.
लाभांशासाठी पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक
जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर १ एप्रिलपासून तुम्हाला शेअर्सवर लाभांश मिळणे बंद होईल. याशिवाय, भांडवली नफ्यावरील टीडीएस कपात देखील वाढणार आहे. तसेच, फॉर्म २६एएस मधील क्रेडिट थांबेल.
डिमॅट-म्युच्युअल फंडचे नियम कडक
आतापासून सेबी डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड खाते उघडण्याचे नियम आणखी कडक करणार आहे. यामध्ये आता प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याचे केवायसी आणि नॉमिनीचे तपशील पुन्हा अपडेट करावे लागतील. अन्यथा तुमचे डीमॅट खाते गोठवले जाऊ शकते.
किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड
जर तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी, तुमच्या बँकेच्या पॉलिसींवर वेळेवर लक्ष ठेवा आणि किमान शिल्लक ठेवा.
जीएसटी नियमांमध्येही बदल
सरकार १ एप्रिलपासून आयएसडी प्रणाली लागू करणार आहे. ज्याचा उद्देश राज्यांमध्ये कर महसूल योग्यरित्या वितरित करणे असेल.
एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत
दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. यावेळी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढू शकतात, असे म्हटले जात आहे. ज्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होईल.
नवीन कर नियम लागू होतील
१ एप्रिल २०२५ पासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. असे असूनही, जर एखाद्या करदात्याला जुन्या कर प्रणाली अंतर्गत 80c चा लाभ घ्यायचा असेल तर त्याला हा पर्याय स्वतंत्रपणे निवडावा लागेल.