बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल
तब्बल १४ वर्षांनंतर बजाजने आपला सर्वात प्रसिद्ध ब्रँड चेतक बाजारात आणला आहे. कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. त्याची सर्वात खास गोष्ट अशी आहे की एकदा चार्ज केली की ९५ किमी पर्यंत मायलेज देऊ शकते. ग्राहक केवळ २००० रुपयांत ही नवीन चेतक स्कूटर बुक करू शकतात. कंपनीने नवीन चेतकमध्ये जबरदस्त लूक आणला आहे. कंपनीने चेतकची एक्स-शोरूम किंमत १ लाख रुपये ठेवली आहे. तसेच बुकिंगची किंमत फक्त २००० रुपये आहे. नवीन स्कूटर पुणे आणि बंगळुरू येथे लॉन्च करण्यात आली आहे.
या स्कूटरला एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच डिजिटल मीटरही आहे. ही स्कूटर दमदार आणि स्टायलिश असणार आहे. स्कूटरचा लूक प्रीमियम आहे. रेट्रो लूक असणाऱ्या स्कूटरमध्ये कर्वी बॉडीवर्क, मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स, स्विचगिअर, फुल एचडी लाइटिंग आणि डिजीटल कंसोल आहे