रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (18:01 IST)

Bank closed : सलग 5 दिवस बँका राहणार बंद? कारण जाणून घ्या

Bank Holidays
Bank closed :डिसेंबर महिन्याचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहे. नवीन वर्ष काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. ख्रिसमस देखील जवळच आहे. ख्रिसमस येत्या सोमवारी आहे. नाताळची सुट्टी आहे. बँका 5 दिवस बंद असणार आहे. बँकेचे कामे त्या पूर्वी उरकून घ्या. 25 तारखेला नाताळची सुट्टी आहे. ख्रिसमस सोमवारी येत आहे.

सलग पाच दिवस बँकांना सुट्ट्या मिळणार आहेत. 23 डिसेंबरला शनिवार आणि 24 डिसेंबरला रविवार असल्याने बँकाही बंद राहतील. अनेक ठिकाणी नाताळनिमित्त 27 तारखेपर्यंत सुट्टी असेल.25-26 डिसेंबर रोजी आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.यानंतर 25-26-27 रोजी ख्रिसमसच्या सणाला कोहिमामध्ये बँका बंद राहतील आणि शिलाँगमध्ये 25-26 रोजी ख्रिसमसच्या सुट्ट्या असतील.

अशा परिस्थितीत या शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी ख्रिसमस आणि डिसेंबर हा चांगला काळ आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या यादीनुसार, डिसेंबरमध्ये देशभरातील बँका एकूण 18 दिवस बंद राहतील.
 
Edited By- Priya DIxit