शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (11:00 IST)

बँक ऑफ महाराष्ट्राने सुमारे ३४ हजार डेबिट कार्ड ब्लॉक केले

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाठोपाठ आता बँक ऑफ महाराष्ट्रानेही ग्राहकांची एटीएम कार्ड सुरक्षेच्या कारणामुळे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बँक ऑफ महाराष्ट्राने सुमारे ३४ हजार ग्राहकांची डेबिट कार्ड ब्लॉक केली आहेत. बँकेने हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेतला असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या आयटी सुरक्षा विभागाने सांगितले आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीत बँकेने हा निर्णय घेतल्यामुळे ग्राहककांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात बँकेने  २१ हजार व्हिसा आणि १३ हजार रूपे कार्ड ब्लॉक केली आहेत. महत्वाचे म्हणजे कोणत्याच ग्राहकाकडून बँकेकडे फसवणुक किंवा कार्डबद्धल तशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नव्हती. तरीही बँकेने स्वत:हूनच हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना कार्ड ब्लॉक केल्याची माहिती एसएमएसद्वारे पाठवली आहे.