1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Banks likely to remain closed for four consecutive days in this week

Bank Alert: या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता; महत्त्वाची कामे उरकून घेण्याचे आवाहन

जर तुमची बँकेतील महत्त्वाची कामे प्रलंबित असतील, तर ती उद्या-परवाच उरकून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, १७ ते २२ मार्च २०२६ दरम्यान देशातील विविध भागांत बँका एकूण ५ दिवस बंद राहतील. यामध्ये गुढीपाडवा आणि ईद यांसारख्या मोठ्या सणांचा समावेश आहे.
 
सुट्ट्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
१७ मार्च (मंगळवार): 'शब-ए-कद्र' निमित्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.
१९ मार्च (गुरुवार): गुढीपाडवा, उगादी आणि तेलगू नवीन वर्षानिमित्त महाराष्ट्र (नागपूरसह), हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, पणजी आणि जम्मू-काश्मीरमध्ये बँका बंद राहतील.
२० मार्च (शुक्रवार): 'ईद-उल-फित्र' निमित्त कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे सुट्टी असेल.
२१ मार्च (शनिवार): ईदच्या निमित्ताने मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, जयपूर आणि भोपाळसह अनेक प्रमुख शहरांतील बँका बंद राहतील.
२२ मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
 
जरी बँक शाखा बंद असल्या, तरी ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि ATM सेवा चोवीस तास सुरू राहतील. 
 
रोख रकमेचे व्यवहार किंवा चेक क्लिअरन्स यांसारख्या कामांसाठी मात्र तुम्हाला बँकेच्या कामकाजाच्या दिवसाची वाट पाहावी लागेल.
पुढील लेख
पुण्यात जमीन व्यवहारात 37 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप; शिवसेनेचे शहराध्यक्ष यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल