मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (07:34 IST)

नगर अर्बन बँकेवर आरबीआय कडून निर्बंध ! ‘ही’ रक्कम काढता येणार नाही!

नगर अर्बन बँकेवर भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून ठेवीदारांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
 
त्याच पद्धतीने बँकेच्या संचालक मंडळाला कोणतेही नवीन कर्ज मंजुरी, ऍडव्हान्स, गुंतवणूक करण्यासाठी बंधने आणली असून यासाठी रिझर्व बँकेची परवानगी घेणे गरजेचे असणार आहे.
 
बँकेची येणाऱ्या काळात आर्थिक प्रगती पाहून याबाबत पुढील निर्णय आरबीआय घेणार आहे. हा निर्णय आज सहा डिसेंबर पासून पुढील सहा महिन्यासाठी लागू असणार आहे. मात्र एकूणच बँकेची येणाऱ्या काळात असणारी आर्थिक परिस्थिती आणि प्रगती पाहून आरबीआय पुढील निर्णय घेऊ शकते.