1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 सप्टेंबर 2018 (00:19 IST)

बीएसएनएल ७५ रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन जाहीर

bsnl unlimited plan
भारतीय संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) नुकताच आपला एक प्रीपेड प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ७५ रुपयांचा असून त्याची वैधता १५ दिवसांची आहे.
 
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग फ्री असणार हे. यासोबतच ५०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सध्या फक्त मुंबई आणि दिल्लीतील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी असणार आहे. लवकरच हा प्लॅन सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
 
बीएसएनल ग्राहक या प्लॅनची मुदत अतिरिक्त पैसे भरून वाढवू शकता. ही मुदत ९० किंवा १८० दिवसांपर्यंत होऊ शकते. मुदत वाढवण्यासाठी ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ९८ रूपयांच्या रिचार्जनंतर तुमची मुदत ९० दिवसांपर्यंत होऊ शकतो. प्रीपेट ग्रहकांना प्रथम ९८ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ७५ रूपयांच्या प्लॅनसाठी पात्र ठरू शकतील.