सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (07:39 IST)

BYJU's Layoffs: बायजूने 1000 कर्मचाऱ्यांना काढले

byjus
एज्युकेशन-टेक्नॉलॉजी कंपनी बायजूने पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. छाटण्यात आलेले कर्मचारी वेगवेगळ्या विभागातील असल्याची माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. तथापि, नवीन कर्मचार्‍यांच्या समावेशासह, कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 50,000 च्या आसपास आहे.
 
नवीन टाळेबंदी कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे दोन टक्के आहे. एक अब्ज डॉलर्सच्या कर्जफेडीवरून अमेरिकेच्या न्यायालयात कायदेशीर वाद सुरू असताना कंपनीतील टाळेबंदीची नवीन फेरी सुरू झाली आहे. बायजूने यापूर्वी सांगितले होते की ते ऑक्टोबर 2022 पासून पुढील सहा महिन्यांत सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल.
 
फेब्रुवारीमध्ये सुमारे 1,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले यामध्ये प्रामुख्याने डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादन वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बायजूने सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के होते.
 
बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये, कर्मचाऱ्यांना आश्वासन देण्यात आले होते की नियोजित 2,500 च्या पुढे कोणतीही टाळेबंदी केली जाणार नाही. त्यानंतर सूत्रांनी सांगितले की कंपनी ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, कस्टमर केअर, इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स आणि इतर क्षेत्रातील काही फंक्शन्स आउटसोर्स करण्याचा विचार करत आहे. 
 



Edited by - Priya Dixit