मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 11 डिसेंबर 2021 (10:45 IST)

व्हिडिओ कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारे CEO Vishal Garg यांना तत्काळ पाठवण्यात आले रजेवर

CEO Vishal Garg was immediately sent on leave has fired 900 employees over a video call
Better.com चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल गर्ग यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. व्हाईस यांनी शुक्रवारी एका ईमेलचा संदर्भ देत अहवाल दिला. या अहवालानुसार, मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) केविन रायन आता कंपनीचे दैनंदिन निर्णय घेतील आणि बोर्डाला अहवाल देतील. कंपनीच्या बोर्डाने नेतृत्व आणि सांस्कृतिक मूल्यांकनासाठी तृतीय पक्षाची स्वतंत्र फर्म नियुक्त केली आहे. जेव्हा रॉयटर्सने Better.com ला प्रतिसादासाठी विचारले तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
 
यापूर्वी, विशाल गर्गने झूम कॉलद्वारे 900 लोकांना नोकरीहून काढल्याबद्दल माफी मागितली होती. त्यांनी पत्र लिहून त्यांच्या या पद्धतीबद्दल कर्मचाऱ्यांची माफी मागितली. या पत्रात विशाल गर्गने आपली चूक मान्य करत आपली पद्धत चुकीची असून आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे म्हटले आहे.
 
झूमच्या बैठकीत 900 जणांना काढून टाकण्यात आले 
लक्षात घेण्यासारखे आहे की, अलीकडेच अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांनी त्यांच्या कंपनी Better.com मधील 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यांनी झूम बैठक बोलावली आणि कंपनीच्या 900 कर्मचाऱ्यांना  पिंक स्लिप दिल्या. कामावरून काढून टाकण्याचे कारण (why vishal garg lays off 900 employees)उत्पादकतेत घट असल्याचे सांगण्यात आले. झूम कॉलमधून 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला, तो विशाल गर्ग (All about better dot com ceo vishal garg) यांना खडूस बॉस म्हणू लागला.
 
900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढण्यात आले?
गर्ग यांनी कर्मचार्‍यांच्या छाटणीमागील कारणे म्हणून बाजारातील कार्यक्षमता, कामगिरी आणि उत्पादकता यांचा उल्लेख केला. झूमवर वेबिनार करताना ते म्हणाले, 'जर तुम्ही या वेबिनारमध्ये असाल, तर तुम्ही त्या दुर्दैवी गटाचा भाग आहात जिथे टाळेबंदी केली जात आहे... तुम्हाला तत्काळ कामावरून काढून टाकले जात आहे.' सीईओ म्हणाले की कर्मचार्‍यांना मानव संसाधन विभागाकडून ई-मेल प्राप्त होतील, ज्यामध्ये फायदे आणि छाटणीबद्दल माहिती असेल.