1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (19:21 IST)

SBI Alert: एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सारख्या सुविधा शनिवारी बंद राहतील

SBI Alert: Facilities like SBI's Internet Banking
आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती आहे. शनिवारी आपण ठराविक कालावधीसाठी इंटरनेट बँकिंग सेवा वापरू शकणार नाही. या दोन दिवस बँकेच्या शाखा देखील बंद राहणार आहेत. शनिवार हा दुसरा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असते.
SBI इंटरनेट बँकिंग सेवेचे युजर्स इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI यासारख्या विविध सुविधांचा वापर नियोजित देखभाल क्रियाकलापांमुळे शनिवार आणि रविवारी एकूण 300 मिनिटांसाठी करू शकणार नाहीत.
SBI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे , "आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की, आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या सोबत रहा." त्यात पुढे म्हटले आहे, "आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी रात्री  23:30 ते 4:30 वाजे पर्यंत  (300 मिनिटे)  तंत्रज्ञान अपग्रेडेशनचे काम होणार. या कालावधीत, INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI अनुपलब्ध असतील. आम्ही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत आणि आपण नेहमी आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो."