शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (17:05 IST)

मिरचीचे भाव वधारले ; पेट्रोल डिझेलपेक्षा ही महाग झाली

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्याचे हवामान पालेभाज्यांसाठी पोषक असल्याने बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. या मुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहे. सध्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्यामुळे मेथी आणि पालक हे 10 रुपयांनी मिळत आहे.  तर कांद्याची पात 15 रुपयाने मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरच्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात हिरव्यामिर्चीचे भाव वधारले आहे. सध्या मिरची 120 रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. पाच रुपयाला मिळणारी मिरची आता 120 रुपये किलोने मिळत आहे. 

सध्या भाजीपाला या दराने मिळत आहे. 
बटाटा 12 ते 20 रुपये किलोने ने मिळत आहे. वांगे 40 ते 60 रुपये, शेवगा 80 ते 120 रुपये, काकडी 20 ते 40 रुपये, कांदे 20 ते 35 रुपये, टोमॅटो 30 ते 50 , काकडी 20 ते 40 , हिरवी मिरची 90 ते  120 , कारले, 50 ते 80 रुपये गवार 100 ते 120 तर भेंडी  60 ते 80 आणि ढोबळी मिरची 55 ते 80 रुपये किलोने मिळत आहे.