सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified रविवार, 15 मे 2022 (11:00 IST)

सीएनजीचे दर पुन्हा वाढले, दरात 2 रुपयांनी वाढ

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन किमती आज, 15 मे, रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक किलो सीएनजी गॅसचा दर 73.61 रुपये प्रति किलो झाला आहे.
 
महिनाभरानंतर सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी 14 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात किलोमागे 2.5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादबद्दल बोलायचे झाले तर, येथे सीएनजी गॅसची किरकोळ किंमत 76.17 रुपये प्रति किलो आहे. त्याच वेळी, मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी गॅसची किंमत 80.84 रुपये प्रति किलो आहे.