मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (16:30 IST)

आता डिझेल मिळणार घरपोच ; 'ही' कंपनी देणार होम डिलिव्हरीची सुविधा

petrol diesel
सध्याच्या आधुनिक काळात आपण घरी बसल्या बसल्या एका क्लिक वर काहीही वस्तू मागवू शकतो. कपडे खाद्य पदार्थ असो किंवा औषधे असो एका क्लिकवर लगेच देशाच्या काना कोपऱ्यावरून लगेच आपल्या दारी हजर असतात.आता भारतात डिझेल सुद्द्धा घरपोच मिळणार आहे. हे खरं आहे. आता डिझेलची होम डिलिव्हरी देखील एका क्लिकवरून सहज होणार.आणि ही होम डिलिव्हरीची सुविधा ;हमसफर इंडिया 'ही कंपनी देणार आहे. ही कंपनी आता चालू आर्थिक वर्षात भारतातील आणखी 200 शहरांमध्ये आपली डिझेलची होम डिलिव्हरी सुविधा देण्याची योजना आखत आहे. 
 
असे या स्टार्टअप कंपनीच्या सह संस्थापक सान्या गोयल यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की ''सध्या आमचा या बाजारात डोअर स्टेप डिझेल डिलिव्हरीचा 20 टक्के भाग असून आम्हाला या आर्थिक वर्षात 30 टक्के भागीदारी करायची आहे. भारताच्या काना-कोपऱ्यात पोहोचायचे असून ऊर्जा वितरणात एक नवीन क्रांती घडवून आणायची आहे. देशभरात घरपोच इंधन वितरणाचं मॉडेल मध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. कोविड च्या कालावधीनंतर तर हे वेगाने वाढले आहे. या क्षेत्रात अधिक विस्तार करण्यासाठीच्या योजना आखल्या जात आहे. सध्या या कंपनीला ई-मोबाईल वाहन चार्जिंग स्टेशनच्या व्यवसायात प्रवेश करायचा असून त्यांची काही कंपन्यांशी चर्चा सुरु आहे.