सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (16:42 IST)

पीएम केअरमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने 500 कोटी तर ICICI बँकेने सर्वाधिक डोनेशन दिले

कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान सिटिझन असिस्टेंस ऍड रिलीफ इन इमरजेंसी सिचुएशन फंड (पीएम केअर्स फंड)मध्ये बॉलीवूड ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी डोनेशन दिले आहे. मुकेश अंबानी यांची रिलायंसने यात 500 कोटी रुपये दान केले आहे. तर बँकांमध्ये सर्वात जास्त दान आयसीआयसीआय बँकेने केले आहे. रतन टाटा यांच्या टाटा समूहाकडून 500 कोटी रुपये, आदित्य बिर्ला ग्रुपकडून 400 कोटी रुपये आणि अदानी ग्रुपकडून 100 कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
मधल्या काळात पीएम केअर्स फंडाची रक्कम किती झाली? तिथे कुणी कुणी देणगी दिली? या पैशाचा वापर कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्थि केले जात होते. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती जात नव्हती. आता ही माहिती समोर आली असून अंबानी, टाटा यांच्यापासून तर बँकांनी किती निधी दिला आहे, हेही समोर आले आहे. 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संकटाशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान आपत्कालीन परिस्थितीमध्ये ना‍गरिकांना मदत आणि सहकार्य निधी म्हणजेच पीएम केअर्स फंडासाठी निधी दिला जात आहेत. 
 
खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांकडूनही पीएम केअर्स फंडासाठी कोट्यावधी रुपये देण्यात आले. बँक यात आघाडीवर असून, ICICI बँकेकडून या फंडासाठी 80 कोटी रुपये, HDFC बँकेकडून 70 कोटी रुपये, कोटक महिंद्रा बँकेकडून 25 कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय बँकेतील कर्मचार्यांकच्या एक दिवसाच्या वेतनातून जम झालेले 1.1 कोटी रुपयेही पीएम केअर्स फंडासाठी देण्यात आल्याचे समोर आले आहे.