1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (15:36 IST)

रिव्हर्स घेणारी ई स्कूटर फ्लो

दिल्ली येथे होत असलेल्या ऑटोशो मध्ये एक वेगळीच स्कूटर शोकेस केली जात आहे. स्टार्टअप कंपनी ट्वेंटीटू मोटर्सने ही स्कूटर तयार केली आहे. फ्लो नावाची ही ई स्कूटर आहेच पण तिला रिव्हर्स ब्रेक दिला गेला आहे. आजपर्यंत आपण फ्रंट गिअर, अ‍ॅक्सिलेटर असलेल्या मोटरबाइक, स्कूटर पाहिल्या आहेत. मात्र या स्कूटरला प्रथमच बॅक गिअर दिला गेला आहे. ही स्कूटर व त्याचे तंत्रज्ञान मोबाइल अ‍ॅपशी जोडलेले आहे. त्यामुळे ती सहज ट्रॅक करता येते. स्कूटरमध्ये काही बिघाड झाला तर त्याचीही माहिती मिळते. या स्कूटरला 2.1 किलो वॉटची मोटर दिली आहे. फुलचार्जमध्ये ती 80 किमी जाते. 85 किलो वजनाची ही स्कूटर 150 किलो वजन वाहून नेऊ शकते. तिचा स्पीड ताशी 60 किमी असून किंमत आहे 60 हजार रुपये. याशिवाय तिला क्रूझ कंट्रोल एलसीडी डिस्प्ले, कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टीम अशी आधुनिक फीचर्स दिली गेली आहेत. एलईडी लाईट प्रोग्राम करण्याची सुविधा यात आहे.