गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (15:16 IST)

फ्लिपकार्टचे ई कॉमर्स नंतर सेवा क्षेत्रात पाऊल

Flipkart's step into the service sector after e-commerce फ्लिपकार्टचे ई कॉमर्स नंतर सेवा क्षेत्रात पाऊल
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लिपकार्ट ने आता सेवा क्षेत्रात पाऊल  टाकले आहे. या मुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. या प्लॅटफॉर्म वरून आपण ऑनलाईन खरेदी करत होतो. आता आपल्या घरातील अप्लायन्सेस  मध्ये बिघाड झाल्यावर त्याला दुरुस्त करण्याचे काम फ्लिपकार्ट ने हाती घेतले आहे.

फ्लिपकार्टची ही सेवा सध्या कोलकाता आणि बेंगळुरू या शहरात सुरु झाली असून आता त्याचा विस्तार देशातील इतर शहरात करणार आहे. फ्लिपकार्टच्या या निर्णयामुळे रॊजगाराची संधी तरुणांना मिळेल. फ्लिपकार्ट ने सेवा क्षेत्रात एक नवी क्रांती आणली आहे. फ्लिपकार्टच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे. सध्या अर्बन कंपनी अशा प्रकारची सेवा देते. फ्लिपकार्टच्या रूपाने अरबन कंपनीला मोठा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. या दोन्ही कंपन्या स्थानिक पातळीवर सेवा साठी सेवा पुरवठादारांची नावे आणि यादी समोर ठेवते. त्या साठी ग्राहकांनी त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून  ज्या साठी सेवा पाहिजे त्याची निवड करू शकतात .