सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (13:24 IST)

टोमॅटोचे भाव वधारले, टोमॅटो ने शंभरी गाठली

tamatar
मुंबईत बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दराने 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडला असून किरकोळ बाजारात देखील टोमॅटोचे दर 90  ते 100  रुपये झाले आहे. या मुळे लोकांच्या अडचणीत भर पडली आहे.दक्षिणेतील काही राज्यांना महाराष्ट्रातून टोमॅटो ची पुरवणी केली जाते. अलिकडच्या काळात टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना दिसत होता. मात्र, आता टोमॅटो उत्पादक
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर या महागाईने मध्यम व गरीब वर्गाची चिंता वाढवली आहे. भाज्यांचे भाव  भाजीपाल्याची दुकाने आणि मॉल्समध्ये भाव 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत.कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोची रोपटे जळाली पीक खराब झाल्यामुळे टोमॅटोचे उत्पन्न घटल्यामुळे टोमॅटोला चांगलाच भाव मिळत आहे. 
 
कडक उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. बाजारात टोमॅटोचे कॅरेट800 ते 1100 रुपयापर्यंत मिळत असून, किरकोळ बाजारात टोमॅटो 80 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

राज्यात टोमॅटोचा समावेश सर्व आहारात केला जातो. त्यामुळे टोमॅटोची मागणी वाढली आहे. दक्षिणेतील राज्यांमधून टोमॅटोची अवाक होते. गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत टोमॅटोची कमतरता झाली आहे. त्या राज्यात महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा केला जातो. टोमॅटोला जास्त मागणी असल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले आहे. टोमॅटोच्या दारात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.