1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:59 IST)

28 बँकांची तब्बल 22,842 कोटी रुपयांची फसवणूक, 'या' कंपनी विरोधात गुन्हा दाखल

ABG शिपयार्डने 28 बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ABG शिपयार्ड संस्थेचे अध्यक्ष ऋषी कमलेश अगरवाल यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
ABG शिपयार्ड कंपनी गुजरातमध्ये दहेज आणि सुरतमध्ये आहे. प्रामुख्याने कंपनीचं काम जहाज निर्मिती आणि दुरुस्तीचं आहे. संबंधित गुन्हा एप्रिल 2012 ते जुलै 2017 दरम्यान झाल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. तसंच ABG शिपयार्ड आणि ABG इंटरनॅशनल या दोन कंपन्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत.
 
एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला 2468 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा पैसा विदेशात पाठवल्याचा आणि गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.