दिल्लीत सोने 1750ने गडगडले
तब्बल 16 दिवसानंतर सोने चांदी बाजार सुरू झाल्यानंतर सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅमला 1750 रुपयांनी गडगडले व भाव 29440 रुपये झाला. चांदीच्या भावात प्रति किलो 3100 रुपयाची घसरण झाली. चांदीचे भाव 41,600 रुपये किलो होते. 11 नोव्हेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने सोने चांदी व्यापार्यांची चौकशी सुरू केल्यानंतर सोने व चांदी दागिन्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दिल्ली एनसीआर, दरीबा कलान, चादनी चौक व करोल बाग भागातील सोने चांदी व्यापार्यांकडे प्राप्तिकर अधिकार्यांनी चौकशी केली होती.