1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (16:24 IST)

Gold and silver सोनं-चांदी झालं स्वस्त

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 52,504 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 48287 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 39536 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 585 शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते 30,838 रुपयांवर आले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 61590 रुपये झाला आहे.
 
 सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाला?
 सकाळी आणि संध्याकाळी सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहेत. सकाळच्या ताज्या अपडेटनुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 137 रुपयांनी आणि 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 136 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने 125 रुपयांनी, 750 शुद्धतेचे सोने 103 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचे सोने 80 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज 520 रुपयांनी स्वस्त झाले आहे.