मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified बुधवार, 30 जून 2021 (19:06 IST)

सोनं स्वस्त झालं !आजचे 10 ग्रॅमचे नवीन दर जाणून घ्या

जे लोक सोने खरेदी करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज एमसीएक्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. एमसीएक्सवरील ऑगस्ट सोन्याचा वायदा दर 10 ग्रॅम 46518 रुपयांच्या पातळीवर आहे. तर चांदीच्या भावात वाढ झाली आहे.चांदी 0.16 टक्क्यांनी वाढून 68381 रुपये प्रति किलो झाली आहे.अलिकडील उच्च किंमतीच्या सोन्याच्या (प्रति 10 ग्रॅम 56254 रुपये) किंमतीची तुलना केली तर सोने अद्याप 9175 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
 
या शिवाय,आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलावे तर इथे देखील सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.सोन्याचा दर प्रति औंस 1,763.63 डॉलरवर आले आहे, ही चार वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.
 
 
24 कॅरेट सोन्याची किंमत-
 
गुड्स रिटर्न वेबसाइटच्या मते, 30 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रत्येक शहरात वेगवेगळी आहे.देशाची राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50080 रुपये आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 48100 रुपये, कोलकातामध्ये 49120 रुपये, मुंबईत 46900 रुपये, हैदराबादमध्ये 47730 रुपये, जयपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 50080 रुपये आहेत.