मंगळवार, 22 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 एप्रिल 2025 (13:15 IST)

सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, मुंबईत एक लाखाचा टप्पा ओलांडला

gold
Gold Price Hike :सध्या लग्नसराईत असल्यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून सोन्याचे दर 1 लाखाच्या पुढे गेले आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,01,000 रुपयांवर पोहोचला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी उडी आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये व्याजदर कपातीची शक्यता, डॉलरमधील कमकुवतपणा आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
सोने आता सामान्य माणसांसाठी महाग झाले आहे. लग्नसराईताच्या हंगामांत मध्यमवर्गीयांसाठी सोने आता बजेटच्या बाहेर गेले आहे. सोन्याच्या या लक्षणीय  वाढीमुळे मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली असून नवीन दागिने बनवण्याच्या मागणीत घट झाल्याचे झवेरी बाजारातील सोन्याचे व्यापारी म्हणत आहे. 
सोन्याच्या या ऐतिहासिक वाढीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की आर्थिक चढउतारांच्या काळात हा धातू सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. आता येत्या आठवड्यात किंमत कोणत्या दिशेने जाते हे येणारा काळ सांगेल. 
Edited By - Priya Dixit