गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 8 एप्रिल 2024 (14:36 IST)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर वधारले, आजचे दर जाणून घ्या

गुढी पाडवा हा हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढी पाडवाच्या दिवशी शुभ कार्ये करतात. दारासमोर रांगोळी काढली जाते, या दिवशी नवीन वाहन किंवा सोनं  खरेदी करतात. या दिवशी सोन्याला मागणी असते.गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर वधारले आहे.आजचे दर प्रतितोळा 71 हजारांच्या पुढे गेले आहे. तर चांदी 82 हजार च्या दराने विकली जात आहे.    

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने विकत घेण्यापूर्वी सोन्याचे दर तपासून पाहावे. आज चे सोन्याचे दर 10 ग्राम सोन्याचे 24 कॅरेट चे दर 71,050 रुपये आहे तर चांदीचे दर प्रतीकिलो 82.050 रुपये आहे. 

सध्या मुबंईत 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार प्रति 10 ग्राम आहे. तर सोन 70 हजाराच्या पुढे आहे. पुण्यात २२ कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत 65 हजार तर 24 कॅरेट सोन्याचे दर 70,920रुपये आहे. नाशिक मध्ये सोन्याचे २२ कॅरेट सोन्याचे दर 65, 010 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 70 हजाराच्या पुढे आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रामाचे दर 65 हजाराच्या पुढे तर 24 कॅरेट सोन प्रति ग्राम 70 हजाराच्या पुढे विकले जात हे.  या वाढत्या दरामुळे लग्नसराईच्या निमित्ताने सोनं विकत घेणं डोकेदुखी ठरत आहे.