गुंतवणूकदारांची पंचाईत! सोन्याचे भाव गडगडले, तर चांदी तब्बल ६ हजारांनी घसरली
इराण-इस्त्रायल तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव; सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
इराण आणि इस्रायल यांच्यात नव्याने सुरू झालेल्या एअर स्ट्राईक आणि एकमेकांवर डागल्या जाणाऱ्या मिसाइल्समुळे पश्चिम आशियामध्ये तणाव कमालीचा वाढला आहे. या युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी तेजी आली असून, याचा थेट दबाव कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे. परिणामी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ८ जून रोजी जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये (COMEX) सोन्याचा भाव घसरून ४,३४०.२० डॉलर प्रति औन्सवर, तर चांदीचा भाव ६७.८२५ डॉलर प्रति औन्सवर आला आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार केल्यास, मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात (शुक्रवारी) एमसीएक्स (MCX) वर सोन्याचा भाव सुमारे २.४७% घसरून १,५५,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आणि चांदीचा भाव सुमारे ६.२७% घसरून २,४८,२०१ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. देशातील प्रमुख शहरांमधील ८ जूनचे प्रति ग्रॅम आणि प्रति किलोचे ताजे दर खालीलप्रमाणे आहेत:
| शहर |
२४ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम) |
२२ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम) |
१८ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम) |
चांदी (प्रति किलो) |
| मुंबई | १५,२७२ रुपये | १३,९९९ रुपये | ११,४५४ रुपये | २,६४,९०० रुपये |
| दिल्ली | १५,५९० रुपये | १४,०१४ रुपये | ११,६९८ रुपये | २,६४,९०० रुपये |
| बंगलोर | १५,२७२ रुपये | १३,९९९ रुपये | ११,४५४ रुपये | २,६४,९०० रुपये |
| चेन्नई | १५,४९० रुपये | १४,१९९ रुपये | ११,९०९ रुपये | २,६९,९०० रुपये |
(टीप: कमोडिटी बाजारातील या घडामोडी केवळ माहितीसाठी आहेत. जागतिक परिस्थितीमुळे दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

