Gold Price on Akshaya Tritiya:अक्षय्य तृतीयेला सोन्याने केली घसरण
Gold Price on Akshaya Tritiya:अक्षय्य तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या निमित्ताने सोन्याची खरेदी वाढते आणि दरही वाढतात. मात्र यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
चांदी 2.14 टक्क्यांनी घसरली
मंगळवारी MCX (MCX Gold Price) वर सोन्याचा भाव 2.13 टक्क्यांनी घसरून 50,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, चांदीच्या दरात 2.14 टक्क्यांची मोठी घसरण झाली. चांदीचा भाव 62,970 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.
24 कॅरेट सोन्याची किंमत
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयबीजेएच्या वेबसाइटवर दर जाहीर करण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत सोन्याचा भाव 2 मे रोजी बंद झालेल्या बाजारभावावर कायम आहे. 2 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 51336 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. याशिवाय 22 कॅरेट सोने 51130 आणि 20 कॅरेट सोने 47024 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.