गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (23:02 IST)

Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे दर जाणून घ्या

Gold-Silver Price Today :आज सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. 999 शुद्धतेचे (24 कॅरेट) दहा ग्रॅम सोने आज 50784 रुपयांवर महागले आहे, तर शुक्रवारी ते 50584 रुपयांवर बंद झाले. 10 ग्रॅम सोने आज 200 रुपयांनी महागले आहे. आज एक किलो चांदी 610 रुपयांनी महागली आहे. आज त्याची 53082 रुपयांना विक्री होत आहे. 

सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एकदा सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. आज सकाळी जाहीर झालेल्या दरांनुसार 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याला 50581 रुपये, तर 916 शुद्धतेच्या सोन्याला 46518 रुपये भाव मिळत आहेत. 750 शुद्ध सोन्याचे दर 38088 रुपये झाले आहेत. त्याचवेळी 585 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने महाग होत असून ते 29709 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय आज एक किलो चांदी 53082 रुपयांना विकली जात आहे. 
 
सोन्या-चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज सर्व प्रकारच्या शुद्धतेच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 999 आणि 995 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 200 रुपयांनी महागले आहे. 916 शुद्ध सोन्याचा भाव 183 रुपयांनी वाढला आहे. 750 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने 150 रुपयांनी महागले आहे. 585 शुद्धतेचे सोने 117 रुपयांनी महागले आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 610 रुपयांनी महागली आहे.