बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:26 IST)

खुशखबर : अर्थसंकल्पानंतर आज सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या किती स्वस्त झाले 10 ग्रॅम सोने

gold
अर्थसंकल्पाच्या एका दिवसानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात थोडीशी घट झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
 
जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव.
एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव आज ०.२५ टक्क्यांनी घसरून ४७,७९२ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याचवेळी आजच्या व्यवहारात चांदी 0.01 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे.
 
रिकॉर्ड हाईपेक्षा 8,400 रुपये स्वस्त आहे 
वर्ष 2020बद्दल बोलायचे झाले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,400 रुपयांनी स्वस्त होत आहे.