रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

जीएसटीचे अंतिम विक्री रिटर्नला मुदतवाढ

सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत अंतिम विक्री रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ दाखल करण्याची सिमामर्यादा दहा दिवसांनी वाढविली आहे. १० जानेवारी २०१८ पर्यंत जीएसटी रिटर्न भरता येणार आहे. वार्षिक व्यवसाय दीड कोटी पर्यंत करणाऱ्या व्यावसायिकांना जुलै-सप्टेंबर दरम्यानचा विक्री कर रिटर्न आता १० जानेवारी पर्यंत भरता येणार आहे. याआधी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. 
 
दीड कोटींपेक्षा अधिक वार्षिक व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत फायनल रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ देखील १० जानेवारी २०१८ पर्यंत भरता येणार आहे. याचसोबत व्यावसायिकांना डिसेंबर महिन्यातील रिटर्न १० फेब्रुवारी पर्यंत भरता येणार आहे.पुढच्या महिन्यासाठी त्यानंतरच्या महिन्याची १० तारीख असणार आहे.