गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 3 एप्रिल 2017 (11:09 IST)

1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी

वस्तू व सेवा कर कायद्याची अंबलबजावणी येत्या एक जुलैपासून करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. जीएसटीबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मेघवाल म्हणाले, की जीएसटीची शंभर टक्के अंबलबजावणी येत्या एक जुलैपासून करण्यात येईल.  जीएसटीसंदर्भातील पुढील बैठक ही श्रीनगरमध्ये होणार असून त्यामध्ये सर्व हरकतींचे मुद्दे सोडविल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.