गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (21:09 IST)

SBI, HDFC, ICICI ने वाढवले ​​FD वर व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा

money
तुम्ही जर मुदत ठेव (FD) घेणार असाल तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI),अॅक्सिस बँक (HDFC)आणि ICICI बँकेसह देशातील अनेक प्रमुख बँकांनी मुदत ठेवींच्या (FD)व्याजदरात वाढ केली आहे.
 
SBI मधील दर: ​​SBI FD व्याज दर 22 ऑक्टोबरपासून लागू होणार्‍यानुसार, बँक सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 6.90 टक्के व्याज देत आहे. एफडी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्यानुसार व्याजदर ठरवला जाईल.
 
ICICI ने वाढवले ​​होते दर: 16 नोव्हेंबर रोजी बँकेने FD व्याजदरात वाढ केली होती. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 30 bps वाढवली आहे. त्यानुसार आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 6.60 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7 टक्के व्याज मिळणार आहे.
 
HDFC मधील व्याजदर: HDFC बँक सामान्य नागरिकांसाठी मुदत ठेवींवर 3 ते 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.5 ते 7 टक्के व्याज देत आहे.
 
HDFC बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या गुंतवणुकीवर हा व्याजदर देत आहे. हे दर 8 नोव्हेंबर 2022 पासून लागू आहेत. ते FD वर 5 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या कालावधीसह विशेष एफडीवर 0.25 टक्के अधिक व्याज देत आहे.

Edited by : Smita Joshi