शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (16:41 IST)

सणासुदीच्या काळात HERO देतेय बंपर ऑफर

सणासुदीचा काळ सुरु झाला असून दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटरकॉर्प (Hero MotoCorp) स्कूटर्स आणि बाईक्सवर बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. हीरोच्या टूव्हिलर्सवर कॅश डिस्काउंट पासून एक्सचेंज बोनसपर्यंत ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात फायदा होणार आहे. हीरोच्या गाड्यांवर नेमका किती फायदगा होणार आहे ते जाणून घेऊया.
 
बाईक ऑफर
या साणासुदीच्या काळात हीरोच्या बाईक्स खरेदीवर तुम्हाला हजारो रुपयांचा फायदा होणार आहे. कंपनी बाईक खरेदीवर ४९९ रुपयांचा लो डाऊन पेमेंट ऑफर, ६.९९ टक्के कमी व्याज दर आणि ३,१०० रुपयांची रोख सवलत देत आहे.
 
160cc – 200cc बाईक्सवर डिस्काउंट
हाय परफॉर्मंस बाईक्सवर देखील हीरो मोटरकॉर्प डिस्काउंट ऑफर देत आहे. यामध्ये ग्राहकांना ४,९९९ रुपये लो डाउन पेमेंट, ६.९९ टक्के कमी व्याज दर आणि ७,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. यासोबत ग्राकांना ३,००० रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट, २,००० चं लॉयल्टी बेनिफिट आणि २००० रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
 
स्कूटर डिस्काउंट
कंपनी स्कूटरवर देखील ऑफर्स देत आहे. स्कूटरवर ४,९९९ रुपयांचा लो डाउन पेमेंट, ६.९९ टक्के कमी व्याज दर आणि जास्तीतजास्त ६,१०० रुपये कॅश डिस्काउंट दिला जात आहे. वेगवेगळ्या स्कूटर्सच्या मॉडेलवर कॅश डिस्काउंट पण वेगवेगळं असणार आहे. २,००० रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि २००० रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.