हिरानंदानी समूह 2 हजार कोटी गुंतवणार
बांधकाम क्षेत्रातील कंपनी हिरानंदानी समूह आगामी काळात प्रकल्पांकरीता 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी मुंबईतील पवईजवळ लक्झरी गृहप्रकल्प साकारणार असून त्यात 330 फ्लॅटस्ची रचना असणार आहे. यातील 150 घरांची विक्री ही झाली असून यातून 1100 कोटी रुपये कंपनीला प्राप्त झाले आहेत. मागच्याच आठवड्यात सदरच्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. विविध टप्प्यात 5 लाख चौ. फु. इतकी जागा प्रकल्पांकरीता विकसित केली जाणार आहे.