शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (16:13 IST)

price of eggs अंड्यांच्या दरात वाढ!

राज्यात अंडी उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने आराखडा तयार केला आहे. कारण राज्याला दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा भासत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. महाराष्ट्र दररोज 2.25 कोटींहून अधिक अंडींची खपत करतो आणि दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
महाराष्ट्र या राज्यांकडून अंडी खरेदी करतो
राज्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विभाग नियोजन करत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे यांनी एजन्सीशी संवाद साधताना दिली. या टंचाईवर मात करण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंडी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 तुटवड्यामुळे किंमती 2 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत
राज्यात अंड्यांचा तुटवडा जाणवू लागल्याने औरंगाबादेत गेल्या दोन महिन्यांत अंड्यांचे भाव वाढले आहेत. घाऊक विक्रेते अब्दुल वाहिद शहा यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये आजमितीस 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ ही किंमत 500 रुपयांच्या (100 अंडी) वर आहे.