शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शनिवार, 6 मे 2017 (10:12 IST)

भारताचा केशर आंबा ऑस्ट्रेलिया प्रथमच विकणार !

भारतातील विविध आंब्यांच्या प्रकारात हापूस या जातीच्या आंब्याची चव जरी यापूर्वी परदेशात चाखली गेली असली व त्या हापूस आंब्याला पसंती मिळाली असली, तरी आता त्याच्याबरोबरीने केशर या जातीचा आंबाही परदेशात व विशेष करून ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे केशर आंब्याचे ४00 ट्रे नुकतेच भारतातून पाठवण्यात आले असून आता ऑस्ट्रेलियातील आंबाप्रेमी या आंब्याची चव प्रथमच चाखणार आहेत.
 
ऑस्ट्रेलियातील परफेक्शन फ्रेश ऑस्ट्रेलिया (पीएफए) या विपणन कंपनीने केशर आंब्याची ही पहिलीच आवक स्वीकारली आहे. अलीकडेच भारतातून आयात आंब्यांबाबत असलेल्या निकषांनुसार परवानगी देण्यात आल्यानंतर केशर प्रथमच ऑस्ट्रेलियात उतरला आहे. 
 
तूर्तास काही प्रमाणात असमाधन व्यक्त झाले असून केशरचे हे फळ काहीसे डाग असलेले व पूर्ण रंग न आलेले आहे. आम्हाला त्याबाबत काही वेगळीच अपेक्षा होती. त्यामुळे आता आमचे प्रय▪असे राहातील की, हे फळ अधिक रंग असणारे व मोठे आणि एकसारखे असणारे असावे. त्यामुळे त्याच्या विक्रीमध्ये अधिक उत्साह येईल, असे पीएफएचे मुख्य कार्यकारी मशेल सिमोनेट्टा यांनी सांगितले.
 
चवीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्याची चव व खाण्यामधील दर्जा चांगला आहे. त्याबद्दल लोकांच्या व आंबा प्रेमींच्या असलेल्या प्रतिक्रिया चांगल्या असून मेक्सिकन केईट्ट (मेक्सिकोचा आंबा) पेक्षा त्याची चव चांगली असल्याचे सांगण्यात आले. येथे मेक्सिकोचे हे आंबे अधिक प्रमाणात बाजारपेठेत येत आहेत.सध्या केशरची येथे झालेली आवक फार कमी असून ही एक प्रकारची चाचणी आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सांगणे व निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही, असे सिमोनेट्टा म्हणाले.
 
केशरची आवक नेमकी किती असेल व किती टन असेल ते आताच सांगता येणार नाही. आयात करण्याचा एकंदर कार्यक्रम हा या आंब्याच्या यशावर अवलंबून आहे. चांगल्या चवीचा आंबा ऑस्ट्रेलियात आणावा, अशी इच्छा असते. हापूस आंबा येथे आवडीने घेणारे ग्राहक आहेत.दरम्यान, भारताच्या कृषी उत्पादन व निर्यात संबंधातील अपेडा संस्थेच्या माहितीनुसार या वर्षात ५0 हजार टन इतकी आंब्याची निर्यात भारतातून केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा जास्त असण्याचा अपेडाचा अंदाज आहे.