शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (15:26 IST)

पामतेल 25 रुपयांनी महाग तर फरसाणचे दर वाढणार

Oils
इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे त्यामुळे भारतामध्येही खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. एका महिन्यात पामतेलाच्या किमतीमध्ये 25 रुपयांची वाढ दिसून येत आहे. खाद्यतेलांच्या भाववाढीमुळे फरसाण, वेफर्स, नूडल्स यासोबतच साबण, शाम्पूच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
देशात प्रत्येक वर्षी दोनशे ते 225 लाख मे. टन तेलाची गरज असून यापैकी जवळपास 65 टक्के अर्थात जवळपास 150 लाख मे. टन तेल आयात करावे लागतं. यामध्ये 80 लाख मे. टन पामतेलाचा समावेश असून इंडोनेशियामधून आयात होणाऱ्या पामतेलाचा वाटा 65 टक्क्यांवर आहे. इंडोनेशियामध्ये तेलाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्यांनी तेलाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा प्रभाव देशातील तेलाच्या किमतींवर दिसून येईल.
 
या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसला आहे. एका महिन्यापूर्वी 170 रुपये लिटर दराने विकले जाणारे पामतेल आता 195 रुपयांवर पोहोचले आहे.